जळगाव – कट्टर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक डॉ. सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी जनता एन्.आर्.सी. चळवळीची शिवप्रेरणा यात्रा चालू झाली आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील माजी सैन्याधिकारी, साधू-संत आणि विविध हिंदू संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १ कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे. या माध्यमातून राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यात्रेच्या कालावधीत विविध जनसभा, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींसमवेत बैठका आणि जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे यात्रेचा समारोप होईल. जनता एन्.आर्.सी. चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन महाराष्ट्राला घुसखोरमुक्त करण्याच्या या संकल्पात सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात सध्या बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोरांची संख्या वाढणे चिंताजनक आहे. त्यांना बाहेर काढल्यास रोजगाराच्या ४० लाख संधी आणि १२ लाख घरे मराठी जनतेसाठी उपलब्ध होतील. यामुळे गुन्हेगारी न्यून होऊन राज्यावरचा आर्थिक ताणही अल्प होईल. जनता एन्.आर्.सी. चळवळ घुसखोरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्यांना सोडवण्यासाठी समर्पित आहे.