गुंडांसारखे वागणारे तृणमूलचे खासदार !
वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांचे खासदार एकमेकांना भिडले. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टेबलावर पाण्याची काचेची बाटली फोडली आणि ती समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने फेकली.