कर्मफलावर तुझा अधिकार नको !

ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती

गीतेमध्ये भगवंताने ‘मा फलेषु कदाचन’ असे म्हटले असून ‘न फलेषु कदाचन’, असे म्हटले नाही. ‘न’ आणि ‘मा’ मध्ये थोडा भेद आहे. ‘न’ म्हणजे नाही आणि ‘मा’ म्हणजे नको. ‘कर्मफलावर तुझा अधिकार नाही’, असे गीता म्हणत नाही, ‘तुझा अधिकार नको’, असे म्हणते. ‘नको म्हणण्यात अधिकाराची मान्यता आहे; पण तू गाजवू नकोस’, असा भाव अभिप्रेत आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘स्थितप्रज्ञ योग’)