President Draupadi Murmu : महिलांकडे वाईट दृष्टीने पाहिले जाणार नाही, असा समाज घडवणे हे प्रत्येकाचे दायित्व ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. काही वर्षांनी शतकोत्सव साजरे करू; परंतु महिलांवरील अत्याचार अल्प झालेले नाहीत.

शेवटच्या श्रावणी सोमवारी दीड लाख भाविकांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन !

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे शेवटच्या श्रावणी अमावास्येला दीड लाख भाविकांनी ‘हर हर महादेवा’च्या जयघोष करत पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.

गणेशोत्सव मंडळांनी अनुमतीनुसार मंडप घातल्याची निश्चिती करण्याचे अतिक्रमण विभागाचे आदेश !

शहरातील गणेशोत्सव मंडळांना महापालिकेकडून परवाने देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेल्या मंडप धोरणानुसार गणेशोत्सव मंडळांना परवाने दिले आहेत. मंडळांकडून टाकण्यात येणारे मांडव धोरणांप्रमाणे आहेत कि नाही

पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमा’चे आयोजन !

‘ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार’ यांच्या वतीने निघोजे येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीच्या मुलांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रम चालू करण्यात आला. या वेळी ह.भ.प. श्री प्रल्हाद महाराज भुईभार यांनी पाठात माऊलींचे चरित्र सांगून मार्गदर्शन केले.

महिलेची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन पावणे तीन लाख रुपये उकळले !

महिलेची अश्लील छायाचित्रे काढून तिच्याकडून पैसे उकळणे, ही घटना धर्मशिक्षणाअभावी समाजाची नैतिकतेअभावी झालेली अधोगती दर्शवते !

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक सुकाणू समितीच्या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमधील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

आरोपीला शिक्षा देण्याचे अधिकार न्यायालयाला आहेत ! – न्या. अभय ओक, सर्वाेच्च न्यायालय

सध्या झुंडशाहीच्या घटना वाढत आहेत. एखादी घटना घडल्यावर राजकीय नेते अथवा अन्य त्याचे भांडवल करून त्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा वा देहदंड देण्याची भाषा करतात. याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार केवळ न्यायालयाचे आहेत…..

पुसेगाव (जिल्हा सातारा) येथील ज्योतिर्विद्या वाचस्पती पू. दीपक कदमगुरुजी यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट !

ज्योतिर्विद्या वाचस्पती पू. दीपक कदमगुरुजी यांची हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सदिच्छा भेट घेतली.

मदरशात सापडले रा.स्व. संघाला ‘आतंकवादी’ संबोधणारे पुस्तक !

सरकारने जिहाद, लैंगिक शोषण, बनावट नोटा, आतंकवाद आदी कुकृत्ये चालणारेे मदरसे कायमचे बंद करणेच आवश्यक आहे !

शेवगाव (अहिल्यानगर) येथे ‘अमलेश्वर’ शिवपिंडीची प्रतिष्ठापना !

नि:स्सीम शिवभक्त प्रमिलादेवी वैशंपायन (योगतज्ञ दादाजी यांच्या पत्नी) यांनी तब्बल ४० वर्षे शिवाची कठोर उपासना करून संस्कारित केलेल्या ‘अमलेश्वर’ शिवपिंडीची प्रतिष्ठापना शेवगावच्या श्रीदत्त देवस्थान संचालित योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन ध्यानमंदिरात विधीवत् पूजाविधीने करण्यात आली.