पुसेगाव (जिल्हा सातारा) – येथील ज्योतिर्विद्या वाचस्पती पू. दीपक कदमगुरुजी यांची हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी श्री. किरण दुसे यांनी पू. कदमगुरुजी यांना समितीच्या कार्याविषयी अवगत करून त्यांना हिंदु जनजागृती समितीचा ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, हा ग्रंथ भेट दिला. पू. कदमगुरुजी यांनी ‘हिंदु जनजागृती समिती चांगल्या प्रकारे राष्ट्र आणि धर्म कार्य करत असून त्यासाठी आशीर्वाद आहे’, असे सांगितले. या प्रसंगी हुपरी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नीतीन काकडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.
ज्योेतिर्विद्या वाचस्पती पू. दीपक कदमगुरुजी यांचा परिचय !
ज्योेतिर्विद्या वाचस्पती पू. दीपक कदमगुरुजी हे पुसेगाव (जिल्हा सातारा) येथे वास्तव्यास असतात. त्यांचा प्राचीन ग्रंथसंपदा, वैदिक संस्कृती, ज्योेतिषशास्त्र, यज्ञविधी, योगशास्त्र, क्रियायोग आदींचा अभ्यास असून त्यांच्याकडे येणार्या लोकांना ते विविध समस्यांविषयी मार्गदर्शन करतात. लोकांच्या अडचणी ते कोणत्याही मोबदल्याविना सोडवतात. अत्यंत तरुण वयात ते धर्माच्या प्रचारासाठी कार्यरत आहे. आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीच्या माध्यमातून लोकांना समाधान मिळवून देण्यासाठीही कार्यरत आहेत.