महापालिकेची एफ.सी. रोडवरील बार आणि पब यांवर कारवाई !

घटना घडल्यावर महापालिका जागी झाली का ? हे खरेतर आधीच करणे आवश्यक होते.

आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर येथे ७ जुलैपासून श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

आषाढीच्या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. ही पूजा पहाटे २.२० वाजता होणार आहे.

थोर कीर्तनकार आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज मोरे यांचे देहू (पुणे) येथे निधन !

२६ जूनला सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावातील नागरिक त्या वेळी उपस्थित होते.

वर्धा येथे देवघरात अवैध दारूचा साठा करणार्‍याला अटक !

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात दारूसाठी देवघराचा वापर करणे, हा जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा दुष्परिणाम ! जिल्ह्यात दारूबंदी असतांना घरात दारू येतेच कशी ?

कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची त्वरित नोंद न घेतल्यास १५ ऑगस्टला उपोषण करणार !

कोकण रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण केले, तरी प्रवाशांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. कोकण रेल्वे कोकणातून जाऊनसुद्धा याचा लाभ गोवा, केरळ यांसह अन्य राज्यांना मिळत आहे.

१६ सहस्र रिक्शाचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल !

नूतनीकरणासाठीच्या विलंब दंडाच्या विरोधात २५ जून या दिवशी जिल्ह्यातील १६ सहस्र रिक्शाचालकांनी बंद पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मुंबईतून मॅफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत !

मुंबईतून कुणाकडून अमली पदार्थ घेतले, ती सर्व साखळी पोलिसांनी नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे !

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी युवकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बलशाली झाले पाहिजे ! – प्रज्वल गुप्ता, अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती

धर्मामुळेच समाजाचे रक्षण होणार आहे. त्यामुळे हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांतून जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन श्री. प्रज्वल गुप्ता यांनी केले.

गोरक्षणाचे कार्य करतांना भगवंताने आमचे रक्षण केले ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब

गाय वाचली, तर जग वाचेल. सरकार त्याचे कार्य करणार आहे. आपल्याला राष्ट्र, धर्म आणि गोरक्षण यांचे कार्य करायचे असेल, तर लढावे लागणार आहे.

ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

तीर्थक्षेत्रांच्या  ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.