महापालिकेची एफ.सी. रोडवरील बार आणि पब यांवर कारवाई !

पुणे येथील अमली पदार्थांचे प्रकरण

पुणे – पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील हॉटेलमध्ये अमली पदार्थ मेजवानीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुणे महापालिकेने कारवाई चालू केली आहे. या रस्त्यावरील जे बार आणि पब यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई करण्यात आली. हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात तोडण्यात आले. (घटना घडल्यावर महापालिका जागी झाली का ? हे खरेतर आधीच करणे आवश्यक होते. – संपादक)