आषाढीच्या निमित्ताने पंढरपूर येथे ७ जुलैपासून श्री विठ्ठलाचे २४ घंटे दर्शन !

पंढरपूर – आषाढी यात्रेच्या निमित्ताने ७ जुलैपासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीचे दर्शन २४ घंटे वारकर्‍यांसाठी चालू रहाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. आषाढीच्या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. ही पूजा पहाटे २.२० वाजता होणार आहे. या वेळी वीणा, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.