पुणे येथील हुजूरपागा शाळेत शिक्षकांनी साजरी केली ईद !

हिंदु विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी शाळेच्या बाहेर दिल्या निषेधाच्या घोषणा !

पुणे – लक्ष्मी रस्ता येथील ‘महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी’च्या कै. सौ. अश्विनी अरुण देवस्थळे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या हुजूरपागा शाळेत ‘ईद-ए-मिलाद’ साजरी करण्यात आली. या वेळी लहान मुलांच्या मनामध्ये सर्वधर्मसमभाव रुजवण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता अनकाईकर यांनी या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. (भगवद्गीतेतील श्लोकांना शालेय अभ्यासक्रमात घेण्यासाठी विरोध करणारे आता याला विरोध करतील का ? – संपादक) शाळेतील छोट्या मुलींनी मुंशी प्रेमचंदलिखित ‘ईदगाह’ ही कथा नाट्यरूपात सादर केली. या नाटकात, छोटा मुलगा हमीद त्याच्या आजीला स्वयंपाक करतांना हात भाजू नये म्हणून ईदसाठी जमा केलेल्या पैशांतून चिमटा खरेदी करून देतो. या सादरीकरणातून मुलांनी त्याग आणि प्रेमाचे महत्त्व सांगितले. सर्वांनी एकमेकांना ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा दिल्या आणि शीरखुर्मा खाल्ला. (हिंदु मुलांना ‘ईद मुबारक’ म्हणायला सांगून इस्लामी कृती लादणे, ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन संघटित व्हावे ! – संपादक) याविरोधात आता हिंदुत्वनिष्ठ पालक आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यात संतापाची लाट उसळली असून काहींनी शाळेबाहेर जमून निषेधाच्या घोषणाही दिल्या.

संपादकीय भूमिका :

हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे का ? संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !