हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी युवकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बलशाली झाले पाहिजे ! – प्रज्वल गुप्ता, अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव तृतीय दिवस (२६ जून) : देशाची सुरक्षा आणि धर्मरक्षा

श्री. प्रज्वल गुप्ता

विद्याधिराज सभागृह – हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असेल, तर युवकांना हिंदु राष्ट्रासाठी प्रेरणा द्यावी लागेल, तसेच त्यांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बलशाली झाले पाहिजे. धर्मामुळेच समाजाचे रक्षण होणार आहे. त्यामुळे हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांतून जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन श्री. प्रज्वल गुप्ता यांनी केले.

श्री. प्रज्वल गुप्ता यांनी युवकांचे संघटन करण्यासाठी काकोरी (जि. लक्ष्मणपुरी) येथे हिंदु जनसेवा समितीची स्थापना केली. ते पुढे म्हणाले, ‘‘लक्ष्मणपुरीच्या आजूबाजूच्या परिसरात वर्ष २०१२ ते २०१५ या कालावधीत ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत होते. त्यासाठी आम्ही वर्ष २०१६ मध्ये १ सहस्र २०० धर्मांतरित घरांमध्ये कलशांची स्थापना केली. त्यांना यज्ञात आहुती देण्याचे आवाहन केले. त्यानंतर ५-५ युवकांना एकेका मंदिराचे दायित्व दिले. अशा प्रकारे १०० मंदिरांशी ५०० युवकांना जोडून दिले आहे. या मंदिरांत आठवड्यातून एकदा स्वच्छता केली जाते, तसेच हनुमानचालिसा म्हटली जात आणि, नामसंकीर्तन केले जाते.’’