दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :आजपासून कोकण रेल्वेमार्गावर २ अधिक गाड्या !; प्रचार चालू असतांना अंबादास दानवे यांचे अपघातग्रस्ताला साहाय्य…

उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल, तसेच पनवेल ते सावंतवाडी अशा दोन विशेष गाड्या कोकण रेल्वेमार्गावर धावतील.

पळशी (जिल्हा जालना) येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची !

जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पळशी गावात प्रचारासाठी गेलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी अडवले.

महायुतीमध्ये असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा झाली त्यात ते बोलत होते.

सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष अशा होत आहेत ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

महायुतीने गेल्या १० वर्षांत प्रचंड विकासकामे केली आहेत. असे असतांना लोकसभा निवडणुकीतील प्रचारात सध्या वैयक्तिक टीका मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे सध्याच्या निवडणुका विकास विरुद्ध विद्वेष, अशा होत आहेत.

बीड येथे चारचाकी वाहनातून १ कोटी रुपयांची रक्कम जप्त !

४ मे या दिवशी जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खामगाव येथील पडताळणी नाक्यावर पडताळणी करत असतांना चारचाकी वाहनात १ कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे.

मावळमधील (पुणे) ‘वंचित’च्या उमेदवारासह निवडणूक आयोगाची नोटीस !

मावळ लोकसभा मतदारसंघातील ‘वंचित बहुजन आघाडी’च्या उमेदवार माधवी जोशी यांच्या प्रचार खर्चाच्या पहिल्या पडताळणीमध्ये तफावत दिसून आली आहे.

धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !

उद्दाम धर्मांध किरकोळ कारणावरून भांडणे उकरून काढतात आणि थेट टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे हिंदु त्यांना घाबरून रहातात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अमरावती येथे आईने पैसे परत न केल्याने धर्मांधांकडून मुलीचा विनयभंग !

अशा धर्मांध वासनांध आरोपींना इस्लामी देशांत जशी शरियत कायद्यानुसार शिक्षा केली जाते, तशी शिक्षा का करू नये ? असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

विविध क्षेत्रांतील तज्ञ आणि संत यांच्यातील भेद !

‘आधुनिक वैद्य (डॉक्टर), अधिवक्ता, लेखापाल इत्यादी सर्वच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ त्यांच्या क्षेत्रातील प्रश्‍नांची उत्तरे लगेच सांगू शकत नाहीत. ‘प्रश्‍नाचा अभ्यास, तपासण्या करतो आणि नंतर सांगतो’, असे म्हणतात.