नवी देहली – न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने एका अधिवक्त्याला ४ मास आणि २ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. एका प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी या अधिवक्त्याने अवमानकारक टिप्पणी केली होती. मे महिन्यात न्यायाधिशांनी अधिवक्त्याविरुद्ध स्वत:हून फौजदारी अवमान खटला चालू केला होता; कारण अधिवक्त्याने न्यायाधिशांवर वैयक्तिक टीका केली होती.
📌A lawyer who committed contempt of court has been sentenced to 4 months of imprisonment by the #DelhiHighCourt
👉 #Hindus believe that likewise efforts should be made to ensure swift and strict punishment for those who insult Hindu Gods and places of worship!
PC -… pic.twitter.com/vZTik7P41o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 8, 2024
न्यायालयाने म्हटले की, अधिवक्त्याने केलेल्या टिप्पण्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि न्यायालय यांचा अवमान करणार्या आहेत. त्यामुळे अपमानास्पद भाषा वापरल्याच्या प्रकरणी अधिवक्त्याला दोषी ठरवले जात आहे. त्यांनी संपूर्ण न्यायव्यवस्थेचा अनादर केला असून त्यांनी कोणतीही क्षमा मागितलेली नाही किंवा त्यांच्या वर्तनाविषयी त्यांना कुठलाही पश्चाताप झाल्याचे दिसत नाही. हे वर्तन तिरस्काराचे असून असून अधिवक्ता म्हणून पात्र असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून असा प्रकार होता कामा नये. त्यामुळे वरील गोष्टी पहाता न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश यांच्या विरोधात ३० ते ४० तक्रारी प्रविष्ट (दाखल) केल्याने त्यांचा हेतू न्यायालयाची अपकीर्ती करण्याचा आहे, हे स्पष्ट होते.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अवमान करणार्यांना जलद गतीने कठोर शिक्षा होण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते ! |