जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर विधानसभेत ८ नोव्हेंबर, म्हणजेच सलग चौथ्या दिवशीसुद्धा प्रचंड गदारोळ झाला. अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम ३७० पुन्हा आणण्यासाठीचा फलक पुन्हा फडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोधी पक्षनेत्यांनी वेळीच रोखले. या वेळी आमदारांमध्ये आदल्या दिवसासारखीच बाचाबाची झाली. एक आमदार पटलावरही (टेबलावरही) चढला. सुरक्षारक्षकाने खुर्शीद अहमद यांना बाहेर ओढले. त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी सभात्याग केला.
संपादकीय भूमिकाजम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० परत आणणे आता कदापि शक्य नाही, हे ठाऊक असूनही मतपेटीचे राजकारण करण्यासाठीचचा आमदारांचा हा प्रयत्न आहे, हे वेगळे सांगायला नको ! |