कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण
पुणे – कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघातातील अल्पवयीन मुलांचे रक्ताचे नमुने पालटणारा अरुणकुमार सिंह हा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शरण आला आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सिंह याने अपघातानंतर मुलांचे रक्ताचे नमुने पालटण्यासाठी ‘ससून’मधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हाळनोर यांना लाच दिल्याचे अन्वेषणामध्ये निष्पन्न झाले होते. सिंह याची येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असे विशेष सरकारी अधिवक्ता शिशिर हिरे यांनी सांगितले आहे.