कोल्हापूर – दीपावलीच्या कालावधीत भाऊबीज सणाच्या निमित्ताने ३ आणि ४ नोव्हेंबरला एस्.टी.च्या कोल्हापूर विभागाने ४ लाख ३७ सहस्र प्रवाशांची वाहतूक करून २ कोटी २६ लाख ३२ सहस्र रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले. यात ७२६ फेर्यांद्वारे ५ लाख ७७ सहस्र ९६४ किलोमीटरची वाहतूक करण्यात आली. याविषयी विभाग नियंत्रक शिवाजीराव जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रवाशांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत, तसेच सर्व चालक-वाहक यांचे अभिनंदन केले आहे.