धर्मांध भाडेकरूकडून हिंदु घरमालकाचा हातोड्याने खून !

किरकोळ कारणावरून वादाचे प्रकरण !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गोवंडी येथील बैंगनवाडी येथे वीजदेयक भरण्यावरून झालेल्या वादातून भाडेकरूने घरमालक गणपति झा (४९) याचा अब्दुल शेख (६३) याने हातोडा मारून खून केला. गोवंडी येथे ही घटना घडली. मारहाणीत गंभीर घायाळ झालेल्या घरमालकाचा रहात्या घरात मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ६३ वर्षीय आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

शेखने लाकडी दांडक्याने आणि हातोड्याने गणपतीला मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. घरमालकाच्या चुलत भावाने याविषयी पोलीस तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून अब्दुल शेखला अटक केली.

शेख याने जिन्यावर चढून गणपतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्याचा प्रतिकार केला असता आरोपीने कमरेला लावलेली हातोडी काढली आणि गणपति झा यांच्या तोंडावर मारली.

संपादकीय भूमिका :

  • हिंदूंनो, कुणाला भाडेकरू म्हणून ठेवायचे याचा १०० वेळा विचार करा !
  • उद्दाम धर्मांध किरकोळ कारणावरून भांडणे उकरून काढतात आणि थेट टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे हिंदु त्यांना घाबरून रहातात ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !