डॉ. तावरे यांनी यापूर्वीही रक्ताचे नमुने पालटले ! – आमदार रवींद्र धंगेकर

ससूनचे डॉ. अजय तावरे यांनी यापूर्वी अनेक वेळा रक्ताचे नमुने पालटले, असा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. २९ डिसेंबर २०२३ या दिवशी डॉ. अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाचे दायित्व घेतले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे बोगदा !

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे खोदकाम करण्यात आले आहे.

मंत्र्यांनी सांगितलेली नियमबाह्य कामे करायला नकार दिल्यामुळे निलंबित केले !

महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ प्रकरण आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.

नवी मुंबईत लसणाचा दर २०० रुपये किलो !

२ मासांपासून किरकोळ बाजारात लसूण २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. मे महिना संपत आला, तरी लसणाचे दर अल्प होत नाहीत.

केरळ : झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणार्‍या सलीमला अटक !

सलीमने १५ मेच्या रात्री अडीच वाजता घरात घुसून पीडितेला घरापासून ५०० मीटर दूर असलेल्या मैदानात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दूरभाष केला असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

Chakraborty Sulibele  Received Veer Savarkar Award :  प्रसिद्ध भारतीय लेखक चक्रवर्ती सुलिबेले यांना वीर सावरकर पुरस्कार !

चक्रवर्ती सुलिबेले हे ‘युवा ब्रिगेड’ या संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांची ही संस्था तरुणांना देशभक्तीसाठी शिक्षित करते.

(म्हणे) ‘मनुस्मृतीतील अनेक श्लोक महिलांविषयी अपमानकारक असल्याने श्लोकांचा समावेश शालेय शिक्षणात घेऊ नये !’

अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जातीयवादाचे धडे शिकवण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निषेध करू, असे मत ‘आम आदमी पार्टी, अनुसूचित जाती’चे पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केले. 

अग्रवाल कुटुंबाने ८४ लाख रुपये थकवल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा कातोरे यांचा आरोप !

अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात काही तक्रार असेल, तर ते सांगण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले होते. त्यानुसार आता तक्रारी समोर येत आहेत.

पाकिस्तान पुन्हा विघटनाच्या वाटेवर ! – इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे की, वर्ष १९७१ देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बांगलादेश अस्तित्वात आला होता. आज देशात पुन्हा अशीच स्थिती निर्माण झाल्यामुळे देश पुन्हा विघटनाच्या वाटेवर आहे, अशी चेतावणी कारागृहात बंदीवासात असलेल्या इम्रान खान यांनी दिली आहे.