पुणे आरोग्य अधिकार्याचा आरोप !
पुणे – महिला कर्मचार्यांचा लैंगिक छळ प्रकरण आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप केला आहे. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात मी मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे हेतूपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने निलंबन करण्यात आल्याचा दावा केला आहे.
डॉ. भगवान पवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, मंत्र्यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य निविदेची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामे यांमध्ये साहाय्य करण्यासाठी दबाव आणला होता; परंतु मी नियमबाह्य कामात साहाय्य केले नाही आणि इतर नियमबाह्य कामे केली नाहीत; म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे, असा दावा भगवान पवार यांनी केला आहे. (या दाव्याविषयी संबंधितांची चौकशी करणे आवश्यक ! – संपादक)
निलंबनामुळे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटुंब तणावामध्ये आहे. निलंबन करतांना माझे म्हणणे सादर करण्याची संधी दिली नाही. निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी पवार यांनी पत्रात केली आहे.