केरळ : झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणार्‍या सलीमला अटक !

कासरगोडू (केरळ) – घरी झोपलेल्या अनुमाने १० वर्षांच्या एका मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सलीम असे या आरोपीचे नाव आहे. कासरगोडू जिल्ह्यातील काझमगड येथे ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला. पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशातून अटक केली.

कर्नाटकातील कोडगू नापोल्कू येथील रहिवासी असलेल्या सलीमने १५ मेच्या रात्री अडीच वाजता घरात घुसून पीडितेला घरापासून ५०० मीटर दूर असलेल्या मैदानात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या वेळी सलीमने तिच्या कानातले चोरून नेले. पीडितेने जवळच्या घरात जाऊन घडलेली घटना सांगितली. सीसीटीव्हीमध्येही ही घटना चित्रीत झाली आहे.

संपादकीय भूमिका

 देशात अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !