नवी मुंबई – २ मासांपासून किरकोळ बाजारात लसूण २०० रुपये किलो दराने विकला जात आहे. मे महिना संपत आला, तरी लसणाचे दर अल्प होत नाहीत. घाऊक बाजारात लसूण १५० ते १६० रुपये किलो या दराने विकला जात आहे. अद्यापपर्यंत लसूण घाऊक बाजारात ५० ते ७० किंवा ८० ते १०० रुपये किलो होता.
मुंबई आणि उपनगर येथील ग्राहकांची लसणाची मागणी अधिक असल्याने प्रतिदिन ८ ते १० गाड्यांची आवश्यकता भासते. मागच्या वर्षी लसणाचे उत्पादन ५० टक्केच झाले आहे. त्यामुळे बाजारात लसणाची कमतरता आहे.