प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह ठाकूर यांची भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी प्रार्थना !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात श्रीपूजकांकडून प्रसाद घेतांना भाजप आमदार टी. राजासिंह, तसेच शेजारी श्री. किशोर घाटगे

कोल्हापूर – भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह ठाकूर यांनी २७ मे या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीचे आणि मातृलिंग यांचे दर्शन घेऊन भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी प्रार्थना केली. या प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांना कोल्हापूर येथे जाहीर सभा घेण्यासाठी विनंती करण्यात आली. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाडगे, बजरंग दलाचे श्री. विशाल पाटील, ‘मराठा तितुका मेळवावा’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, सर्वश्री पांडुरंग पाटील, सुनील पाटील, अवधूत भाट्ये यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.