प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह यांची हिंदुत्वनिष्ठांकडून सदिच्छा भेट !

कोल्हापूर, २७ मे (वार्ता.) – भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाजप आमदार टी. राजासिंह यांची कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी सदिच्छा भेट घेतली. ते सांगली येथे होणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चासाठी जाण्याच्या अगोदर कोल्हापूर येथे आले होते. या प्रसंगी त्यांना २६ मे या दिवशी प्रकाशित झालेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव विशेषांक (भाग १) भेट देण्यात आला.

या प्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. अजय केळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे, भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, बजरंग दलाचे श्री. सुजित कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.

कोल्हापूर येथे लवकरच हिंदू एकता आंदोलन आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने आमदार टी. राजासिंह यांची जून महिन्यात सभा घेण्याचे नियोजन आहे. त्या संदर्भातील विनंतीपत्र त्यांना देण्यात आले. आमदार टी. राजासिंह यांनी ‘या संदर्भातील दिनांक लवकरच कळवू’, असे या प्रसंगी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना सांगितले.

विशेष : या प्रसंगी आमदार टी. राजासिंह यांनी शिवानंद स्वामी यांच्याकडे ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्य कसे चालू आहे ?’, अशी प्रेमाने चौकशी केली.