मूल्यांची जोड नसेल, तर शिक्षण केवळ अहंकार वाढवते ! – रमेश बैस, राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस

मुंबई – शिक्षणाला मूल्य, नीतीमत्ता आणि मानवता यांची जोड देणे आवश्यक आहे. तसे नसेल, तर शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केले. खार येथील रामकृष्ण मठाच्या शताब्दी वर्षाची सांगता २६ मे या दिवशी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झाली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी राज्यपालांनी ‘रामकृष्ण मिशनने शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना संस्कारित करावे. मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद हे महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यामुळे मिशनने गरीब आणि वंचित महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवून आत्मनिर्भर बनवावे’, असे आवाहन केले. या वेळी मिशनच्या बेलूर मठाचे उपाध्यक्ष स्वामी दिव्यानंद, मुंबईमधील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष सत्यदेवानंद यांसह मठाच्या विविध केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.