लोणी काळभोर (पुणे) येथे विज्ञापन फलक कोसळल्याच्या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट पथकर नाक्याजवळ असलेल्या ‘गुलमोहर लॉन्स’ येथील विज्ञापन फलक कोसळल्याची घटना १८ मे या दिवशी घडली. या घटनेत वरातीचा घोडा आणि ३ जण घायाळ झाले होते. त्या प्रकरणी जागामालक शरद कामठे आणि ठेकेदार संजय नवले अन् बाळासाहेब शिंदे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.