पुणे येथे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

पुणे – सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात विनाअनुमती जमाव गोळा करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस शिपाई अभिजित वालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये विनाअनुमती जमाव जमवला, घोेषणा दिल्या, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

१२ मे या दिवशी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ‘भाजपचे कार्यकर्ते पद्मावती परिसरामध्ये मतदारांना पैसे वाटप करत आहेत’, अशी तक्रार करून पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये ठाण मांडून बसले होते. ‘पैसे वाटप करणार्‍यांवर त्वरित कारवाई करा’, अशी धंगेकर यांची मागणी होती. या घटनेनंतर भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, महेश बावळे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहकारनगर पोलीस ठाण्यात जमा झाले.