कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतर कायम रहाणार !

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

गोव्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करा ! – ‘वीर सावरकर युवा मंच, डिचोली’ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वीर सावरकर यांच्याविषयी योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविषयी विनाकारण निर्माण केल्या जाणार्‍या वादांना चाप बसेल. यासाठी सर्व सामान्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा आणि विद्यार्थ्यांना  विनामूल्य दाखवावा. असे निवेदनात म्हटले आहे

स्वभावदोषांच्या निवारणासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे

गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्‍या आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी अखंड धडपडणार्‍या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !

फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.

प्रीतीने सर्वांशी जवळीक साधणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

मला सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत तळेगाव येथे शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली असताना तेथील जिज्ञासू आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सद्गुरु स्वातीताईंच्या प्रती पुष्कळ आदर पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.

आदिवासी शाळांतील मुलांचे दूध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोट्यवधी रुपयांचा अपहार !

राज्यातील आदिवासी शाळांमध्ये देण्यात येणार्‍या दुधात ८० कोटींचा आणि सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या ‘पोषण आहारा’मध्ये २५० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप ‘शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

सातारा येथे बुलेटचालकांवर कारवाई !

येथील मोती चौकात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणार्‍या बुलेटचालकांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली. गत काही दिवसांपासून शहरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणारे बुलेटचालक सुसाट वेगाने बुलेट चालवत होते.

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील बसथांब्यांच्या पाट्या काढून टाकल्याने गावातील प्रवाशांची गैरसोय !

सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणामध्ये गावालगत असणार्‍या बस थांब्यांच्या पाट्या, तसेच काही ठिकाणी बसथांबे काढून टाकल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

निवडणूक कामकाज करणार्‍यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवा ! – जिल्हाधिकारी

आगामी लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.