मुंबई – केंद्र सरकारने गतवर्षी ८ डिसेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी ३१ मार्च २०२४ अखेर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे. केंद्र सरकार सध्या महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. त्या अंतर्गत निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला.
सौजन्य : abp माझा
सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.