प्रीतीने सर्वांशी जवळीक साधणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरू स्वाती खाड्ये

१. सद्गुरु स्वाती खाडये यांची अनुभवलेली प्रीती

श्रीमती सुरेखा सरसर

अ. ‘मला काही दिवसांपूर्वी पुणे सेवाकेंद्रात जाण्याची संधी मिळाली. सद्गुरु स्वाती खाडये त्याच कालावधीत सेवाकेंद्रात आल्या होत्या. त्या वेळी ‘मला त्यांचा प्रेमळ सहवास मिळाला’, हे मी माझे भाग्य समजते. त्यांच्या वास्तव्यामुळे सेवाकेंद्रात उत्साह आणि चैतन्य जाणवत होते.

आ. एक दिवस सेवाकेंद्रातील वयस्कर साधकांना सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग लाभला. त्या वेळी सद्गुरु स्वातीताई प्रत्येकाचे अनुभव लक्षपूर्वक ऐकत होत्या. तेव्हा मला त्यांची सर्वांप्रती असलेली आत्मीयता आणि प्रीती जवळून अनुभवता आली.

इ. त्यांनी सेवाकेंद्रातून निघतांना मला प्रेमाने जवळ घेतले. तेव्हा त्यांच्या स्पर्शाने माझी पेशी न् पेशी पुलकित झाली. मला काही क्षण माझ्या आईच्या स्पर्शातील माया आठवली.

२. मला सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत तळेगाव येथे शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. तेथील जिज्ञासू आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांना सद्गुरु स्वातीताईंच्या प्रती पुष्कळ आदर आहे. ते पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.

‘अशा प्रेमळ सद्गुरु स्वातीताईंना उदंड आयुष्य लाभो’, अशी मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करते.’

– श्रीमती सुरेखा सरसर (वय ६६ वर्षे), नांदेड (१३.३.२०२४)