‘इस्रो’त व्यवस्थापक असल्याचे खोटे सांगून सायबर चोराकडून परिचारिकेची फसवणूक !

परिचारिकेने एका विवाह संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. अभिनव राऊतने तिच्या भ्रमणभाषवर संपर्क साधला. स्वतः इस्रोत व्यवस्थापक असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला, तसेच विवाहाचे वचन दिले.

खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून १६ लाख ७६ सहस्र रुपयांची चोरी !

महिलेच्या विनयभंगाच्या खोट्या आरोपाखाली घरातील सर्वांना कारागृहात पाठवून चोरट्यांनी घरात शिरून चोरी केली आणि १६ लाख ७६ सहस्र रुपयांचा माल चोरला. अरुणकुमार श्यामानंद त्रिपाठी यांनी तक्रार दिली.

खोट्या फेसबूक खात्याद्वारे फसवणूक करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

वाढत्या सायबर चोरीवर सरकार कधी नियंत्रण आणणार ?

कीर्तनकारांनी सांप्रदायिक, सामाजिक कार्याच्या समवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी सजग राहिले पाहिजे ! – ह.भ.प. नरहरी महाराज, सचिव, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ

हिंदु जनजागृती समिती समवेत मी गेली अनेक वर्षे कार्य करत आहे. अनेक मोहिमा वारकरी संप्रदाय आणि समितीने एकत्रितपणे राबवल्या अन् त्या यशस्वी झाल्या आहेत, असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज यांनी व्यक्त केले.

अमरावती येथे बस दरीत कोसळून तिघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील चिखलदराजवळ बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात २ महिला आणि १ बालक अशा तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले आहेत. घाट वळणाच्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेने दीड लाख रुपयांच्या सायलेन्सर आणि हॉर्नवर फिरवला बुलडोझर !

येथील वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गत आठवड्यात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या वेळी दीड लाख रुपयांचे सायलेन्सर आणि हॉर्न शासनाधिन करण्यात आले होते. या साहित्यावर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने बुलडोझर फिरवला आहे.

सरकारच्या ‘कोकण विकास महामंडळा’ची दुरवस्था : गुंतवणूक केलेली सर्व आस्थापने बंद !

कोकणाच्या विकासाकरता विविध आस्थापनांनी या महामंडळाशी गुंतवणूक करून चालू केलेले जवळजवळ सर्व प्रकल्प निष्क्रीय आहेत, तर काही प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

व्हॉट्सॲप गटातील राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी पुणे विद्यापिठातील विद्यार्थ्याला मारहाण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात शिकणार्‍या अनिल फुंदे या विद्यार्थ्याला व्हॉट्सॲप गटात पाठवलेली राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी अनिल फुंदे यांस लाथा-बुक्क्याने आणि आसंदी यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.

‘वेदांता’ आस्थापनाला डिचोली येथील खाण क्षेत्रातून प्रतिवर्षी ३० लाख टन खनिज उत्खनन करण्याची अनुमती

गोव्यात ६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर खाण व्यवसाय चालू होणार आहे. खनिज उत्खननासाठी अनुमती मिळालेले ‘वेदांता’ हे पहिले ‘लिज’धारक आस्थापन आहे.

खच्चून भरलेल्या प्रवाशांमुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये शेकडो प्रवाशांना चढताच आले नाही !

प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्‍या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही.