नागपूर – येथील ३३ वर्षीय परिचारिकेला ‘इस्रो’त व्यवस्थापक असल्याचे खोटे सांगून चांगल्या पदावर नोकरी देण्याचे आमीष दाखवून सायबर चोराने फसवणूक केली. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी अभिनव राऊत याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. परिचारिकेने एका विवाह संकेतस्थळावर विवाहासाठी नोंदणी केली होती. अभिनव राऊतने तिच्या भ्रमणभाषवर संपर्क साधला. स्वतः इस्रोत व्यवस्थापक असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला, तसेच विवाहाचे वचन दिले. त्याने परिचारिकेकडून ९० सहस्र रुपये घेतले.
संपादकीय भूमिकावाढत्या सायबर चोरीवर सरकार कधी नियंत्रण आणणार ? |