शिवसेनेचे श्रेयस गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे १३ कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती !

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच शिवसेना युवानेते श्रेयस माधवराव गाडगीळ यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शासनाकडून १३ कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती मिळाली आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटवले !

केंद्रीय निवडणुकीपूर्वी या अधिकार्‍यांचे स्थानांतर करण्याची सूचना निवडणूक आयोगाकडे केली होती; मात्र यावर कार्यवाही न झाल्यामुळे स्वत: निवडणूक आयोगाने या अधिकार्‍यांचे स्थानांतर केले.

खासगी जागा आणि सार्वजनिक ठिकाणे येथे झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध !

जिल्ह्यात निवडणूक संपूर्ण शांतता प्रक्रियेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये ६ जूनपर्यंत स्थापन करण्यास जिल्हादंडाधिकार्‍यांनी निर्बंध घोषित केले आहेत.

विनाअनुमती निवडणूक कार्यक्रम राबवल्यास कारवाई !

प्रांताधिकारी भोसले पुढे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्व पक्षांचे साहाय्य आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. सातारा तालुका विधानसभा मतदारसंघात एकूण ४४५ मतदान केंद्रे आहेत.

गोवा : अवैध बांधकामावरून रुमडामळ येथील नागरिकांचा सरपंचांना घेराव

पंचायत कारवाई करत नाही, याचा अर्थ पंचायतीचा अवैध कामांना पाठींबा असल्याचे कुणी म्हटले, तर त्यात चूक ते काय ?

हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

४ सहस्र ५०० संशयितांवर होणार प्रतिबंधात्मक कारवाई !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

Loksabha Elections 2024 : ५० सहस्र रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगतांना कागदपत्रे आवश्यक !

या काळात जे नागरिक ५० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बाळगतील, त्यांनी त्यासंबंधी पुरावा असलेली कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा हे पैसे जप्त केले जातील, अशी चेतावणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

प्रारब्धावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय !

कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले