खासगी जागा आणि सार्वजनिक ठिकाणे येथे झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध !

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे हितचिंतक यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे अशा कोणत्याही व्यक्तीच्या जागी, इमारत, आवार, भिंती इत्यादींवर संबंधित मालकाच्या अनुमतीविना, तसेच संबंधित परवाना प्राधिकरणाच्या अनुमतीविना वापर करण्यास ४ जूनपर्यंत जिल्हादंडाधिकारी यांनी निर्बंध घोषित केले आहेत.

तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध !

जिल्ह्यात निवडणूक संपूर्ण शांतता प्रक्रियेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीकोनातून धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये ६ जूनपर्यंत स्थापन करण्यास जिल्हादंडाधिकार्‍यांनी निर्बंध घोषित केले आहेत.