निवडणूक आयोगाचा निर्णय !
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि उपायुक्त पी. वेलरासू यांनाही पदावरून हटवले आहे. केंद्रीय निवडणुकीपूर्वी या अधिकार्यांचे स्थानांतर करण्याची सूचना निवडणूक आयोगाकडे केली होती; मात्र यावर कार्यवाही न झाल्यामुळे स्वत: निवडणूक आयोगाने या अधिकार्यांचे स्थानांतर केले. यासह गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील सचिवांनाही निवडणूक आयोगाने हटवले आहे.