शिवसेनेचे श्रेयस गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे १३ कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती !

मिरज – सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच शिवसेना युवानेते श्रेयस माधवराव गाडगीळ यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे शासनाकडून १३ कोटी रुपयांच्या विकासकामांना संमती मिळाली आहे. यात मिरज कृष्णाघाट येथील हिंदु स्मशान भूमी बाजूस पूरसंरक्षक भिंत आणि घाट बांधण्यासाठी ४ कोटी ९६ लाख रुपये, ढवळी येथील पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी ४ कोटी ६७ लाख रुपये, तसेच म्हैसाळ येथील पूरसंरक्षक कामासाठी ४ कोटी ९७ लाख रुपये निधी संमत करण्यात आला आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाने काढलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, कृष्णा नदी किनार्‍यावर हिंदु स्मशानभूमी असून त्या समोरील नदीकाठाचे पुरापासून संवर्धन अत्यावश्यक आहे. या संदर्भात स्थानिक प्रतिनिधींनी शासनास कळवल्यावर क्षेत्रीय कार्यालयाने प्रत्यक्ष पहाणी करून अंदाजपत्रक सिद्ध केल्यावर शासनाने ते संमत केले आहे. त्यानुसार पूरसंरक्षक ४ कोटी ९६ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत.