सांगली – प्रतिवर्षीप्रमाणे ‘श्री समर्थ व्यायामशाळे’मध्ये दासनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून पूर्वीपासून चालत आलेल्या जोर मारण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात पैलवान शुभम चव्हाण याने १० मिनिटांत ३१० जोर मारून प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक संतोष तांबट याने, तर तृतीय क्रमांक प्रथमेश वैद्य याने पटकावला. भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ आणि त्वचारोगतज्ञ डॉ. चंद्रशेखर पुरंदरे यांच्या हस्ते पारितोषिक समारंभ पार पडला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच श्री. रामकृष्ण चितळे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गुरुनाथ कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. हरिदास कालीदास, सर्वश्री वैभव माईणकर, वैभव केळकर, माधवराव कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.