हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे अहिल्यानगर येथे निवेदन !
अहिल्यानगर – पू. संभाजीराव भिडेगुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे. पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) शोधून कारवाई करावी, या संदर्भातील निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने ५ मार्चला येथील जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
या वेळी निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दिगंबर गेंट्याल, साईराम देवेनपल्ली, बापू खोमणे, ओंकार आडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री बापू ठाणगे, संदीप खामकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. परमेश्वर गायकवाड, कु. प्रतीक्षा कोरगावकर आदी उपस्थित होते.