सनातनचे साधक डॉ. सुरज जाधव यांना विद्यावाचस्पती (पीएच्.डी.) पदवी प्रदान !

डॉ. सुरज जाधव

कराड, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील सनातनचे साधक आणि महात्मा फुले कृषी विद्यापिठाशी संलग्न असलेल्या गारगोटी (कोल्हापूर) येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ. सुरज जाधव यांना विद्यावाचस्पती (पीएच्.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली. पशूविज्ञान आणि दुग्धशास्त्र (ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स) या विभागाची ही पदवी आहे.

विद्यापिठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. त्यात कुलगुरु प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते ही पदवी डॉ. सुरज यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. डॉ. सुरज सध्या गारगोटी येथील डॉ. आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालयात साहाय्यक प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यशाचे श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दिले आहे.