पुणे येथील ‘ससून’मधून आरोपी लीलाकर पसार झाल्याप्रकरणी २ पोलीस शिपाई निलंबित !

शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती यांना धमकी दिल्याचे प्रकरण !

पुणे – कोथरूड भागातील शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती यांना सामाजिक माध्यमांतून धमकी दिल्याप्रकरणी मार्शल लीलाकर याला अटक करण्यात आली होती. धमकी दिल्याप्रकरणी लीलाकर याला फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. १० फेब्रुवारी या दिवशी छातीमध्ये दुखत असल्याचे त्याने सांगितले. त्याला २ पोलीस शिपाई ‘ससून रुग्णालयां’मध्ये उपचारांसाठी घेऊन गेले होते. तेथून तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई निखिल पासलकर आणि कालूसिंह खाडे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

कर्तव्यचुकार पोलिसांमुळे आरोपी पळून जाणे गंभीर आणि संतापजनक !