केरळ येथील सनातन संस्थेचा साधक कु. आकाश सिजू याचे सुयश !

कु. आकाश हा भवन्स वरुणा या विद्यालयातील १२ वीचा विद्यार्थी आहे आणि सर्व शिक्षकांचा लाडका आहे. त्याच्याविषयी शिक्षक म्हणतात, ‘‘तो स्वतः कितीही कष्ट घेऊन इतरांना साहाय्य करतो.

एका स्त्री संतांचे घरी आगमन झाल्यावर साधिकेने अनुभवलेली त्यांची प्रीती आणि कृपा !

घरात सर्वत्र प्रकाश पसरला असून घर व्यापक आणि मोठे झाले आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही सर्व जण भावावस्थेत होतो. सर्वांचे मन देवीच्या चरणी एकाग्र झाले होते.स्त्री संतांची ओटी भरतांना माझ्या मनामध्ये भाव दाटून आला होता.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

वेदपरंपरेचे रक्षणकर्ते, विश्वभर गीतेचा प्रसार करणारे आणि श्रीराममंदिराचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

फोंडा (गोवा) येथील सौ. सुचेता नाईक यांनी त्यांच्या यजमानांची पासष्ठी आणि स्वतःच्या एकसष्ठी शांतीविधीच्या वेळी आनंदावस्था आणि निर्विचारावस्था अनुभवता येणे

श्री. वझेकाकांनी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) माझ्या यजमानांची देवता श्रीविष्णु आणि माझी मार्कंडेय अशा देवता सांगितल्या होत्या. त्या देवतांचे पूजन करतांना ‘आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांचे पूजन करत आहोत’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.

बालपणी, तारुण्यात आणि वृद्धावस्थेत कसे वागावे ?

तरुणपणी अधिक पैसा मिळवला, तर म्हातारपण सुखाचे जाते. त्याचप्रमाणे तरुणपणी साधना केली, तर म्हातारपण सुखाचे जाते. 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधना आणि सेवा यांतील आनंद अनुभवणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. नंदिनी उल्हास पोकळे (वय ६१ वर्षे) यांनी उलगडलेला स्वतःचा साधनाप्रवास !

आताही ‘प.पू. गुरुदेवांनी वापरलेल्या त्या ताटल्या माझ्याशी बोलत आहेत आणि मला बोलवत आहेत’, असे मला जाणवते. मला त्यांच्यात प्रीती जाणवते. त्या मला आनंद देतात. त्या मला प.पू. गुरुदेवांची सतत आठवण करून देतात.