ठाणे – कोलशेत येथील शिक्षिका तिच्याकडे घरकाम करणार्या ११ वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (केवळ गुन्हा नोंदवून न थांबता शाळेतून बडतर्फच करायला हवे ! – संपादक) ही शिक्षिका तिला जेवण्यासाठी पुरेसे अन्न देत नव्हती. मुलाला सांभाळण्याचे दायित्वही त्या मुलीवर सोपवले होते. सांभाळ व्यवस्थित न केल्यास पाईपने मारहाण करत होती. तिला घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करत होती. कारण काढून घरातून बाहेर पडून मुलीने बाहेरच्या महिलांकडे आईला संपर्क करून देण्याची विनंती केली. महिला अधिवक्त्याने साहाय्य करत तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.