छत्रपती संभाजीनगर – शहरातील सर्व दुकाने आणि कार्यालये यांचे फलक मराठी भाषेत लावावेत, यासाठी महापालिकेने १५ दिवसांची मुदत दिली आहे. तसे आदेश येथील महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ८ जानेवारी या दिवशी दिले. मुदत संपल्यावरही दुकानदारांनी दुकानांचे फलक मराठीत नाही लावले, तर दुकाने आणि प्रतिष्ठान यांना बंद करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
महापालिका प्रशासकांनी ७ जानेवारी या दिवशी शहरातील काही भागांत पहाणी करत दुकाने आणि प्रतिष्ठाने यांची नावे राज्यशासनाच्या आदेशानुसार मराठी भाषेत लिहिण्याचे निर्देश दिले, तसेच मोठ्या अक्षरात नावे लिहावे, असेही सांगितले आहे.