Narakchaturdashi : स्वभावदोष, अहंकार आणि विकार रूपी नरकासुराच्या तावडीतून सोडवण्यासाठी श्रीकृष्णाला आळवून देहासह मनानेही परिशुद्ध होऊया !
‘आश्विन कृष्ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’, असे म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने क्रूरकर्मा नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीवासातील १६ सहस्र स्त्रियांना मुक्त केले. या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी घरोघरी दीपोत्सव साजरा केला.