|
अकोला – ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी तिसर्या दिवशी म्हणजे ९ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ते मागे घेतले. या दिवशी दुपारपर्यंत उपोषणाची नोंद न घेतल्यामुळे ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शहरातील रिंगरस्त्यावरील, तसेच पातूर आणि अकोट शहरातील पीक विमा आस्थापनाच्या (एच्.डी.एफ्.सी. इन्श्युरन्स कंपनी) कार्यालयांची तोडफोड करून निषेध नोंदवला.
गेल्या वर्षीची रखडलेली पीक विम्याची रक्कम, तसेच यंदाची पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करावी, ऑक्टोबर २०२२ मधील अतीवृष्टीच्या हानी भरपाईची रक्कम तातडीने मिळावी, तसेच थकित वीजदेयंकामुळे रखडलेली नादुरुस्त रोहित्रांची विनाअट दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. पातूर शहरातील विमा आस्थापनाच्या कार्यालयात पातूर तालुका आणि शहर शिवसैनिकांनी तोडफोड केली. आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेतले होते. सूचनापत्र देऊन त्यांना सोडण्यात आले.
संपादकीय भूमिकातोडफोड करून हिंसक मार्गाने निषेध नोंदवण्यापेक्षा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे आवश्यक ! |