सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘पूर्वी एकदा प.पू. डॉक्टरांना एका क्षेत्रातील काही मान्यवर व्यक्ती भेटायला येणार होत्या. ‘त्यांना भेटतांना काय विषय सांगायचा ?’, याचे प.पू. डॉक्टरांनी संगणकीय धारिकेत टंकलेखन केले होते. प.पू. डॉक्टरांनी सांगितलेल्या सुधारणा मी धारिकेत करत होते. ती धारिका समजायला पुष्कळ कठीण होती. २ – ३ दिवस ही सेवा चालू होती. ती सेवा करतांना मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. मी त्यात काय सुधारणा करत आहे, हेही मला नीट आकलन होत नव्हते. मला होणारा त्रास मी प.पू. डॉक्टरांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘हं ! त्रास पुष्कळ वाढला आहे. मलाही पुष्कळ त्रास होत आहे.’’ त्यानंतर एका साधकाने ‘आज होणारी भेट रहित झाली आहे. आजच्या ऐवजी परवा भेट असेल’, असा निरोप दिला. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आजचा सत्संग रहित झाला. आपली सेवा पूर्ण झाली नाही; म्हणून देवाने आपली काळजी घेतली. आपल्याला चक्क २ दिवस वाढवून दिले; पण आपण मात्र सेवा पूर्ण करण्यात कमी पडलो.’’ थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘ही मात्र देवाची अगदी लीलाच आहे !’’ नंतर मला ‘देवाने या चुकीतून मला वाचवल्याविषयी माझ्या मनात कृतज्ञता निर्माण झाली.’
– कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०२३)