मुंबईतील रस्‍त्‍यांवर पाणी फवारणीसाठी १ सहस्र टँकर !

मुंबई – धुळीला आळा घालण्‍यासाठी शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यांवर पाण्‍याची फवारणी करण्‍यात येणार आहे. यासाठी १ सहस्र टँकरची व्‍यवस्‍था करण्‍याची सूचना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिली आहे. ९ नोव्‍हेंबर या दिवशी एकनाथ शिंदे यांनी राज्‍यातील सर्व विभागीय आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी, महानगरपालिका आयुक्‍त, पोलीस अधीक्षक, मुख्‍य कार्यवारी अधिकारी आदींची ऑनलाईन बैठक घेतली. या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी वरील आदेश दिले.

मुंबईत विविध ठिकाणी चालू असलेल्‍या बांधकामांमुळे धुळीचे साम्राज्‍य पसरू नये, यासाठी पाण्‍याची फवारणी करून रस्‍ते स्‍वच्‍छ करावेत. रस्‍त्‍यांवर साचलेली धूळ स्‍वच्‍छ करण्‍यासाठी विशेष पथकांची नियुक्‍ती करावी. यांसह नागरी वनक्षेत्र वाढवण्‍याचे निर्देशही मुख्‍यमंत्र्यांनी दिले.