अमेरिका इस्रायलच्या समवेत आहे, हे जगाला दाखवायचे होते ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलच्या दौर्‍यावर !

गाझा शहरातील रुग्णालयावर रॉकेटद्वारे आक्रमण : ५०० जण ठार

हमासकडून इस्रायलवर आरोप, तर इस्रायलकडून हमासचेच रॉकेट पडल्याचा दावा

सिंधुदुर्ग : शिक्षक मिळावा, यासाठी पालकांनी मालवण पंचायत समितीच्या कार्यालयात भरवली शाळा

जिल्ह्यात कुठल्या ना कुठल्या शाळेत शिक्षक नसल्याने पालक, ग्रामस्थ आंदोलन करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून, एका शाळेत शिक्षक अधिक असल्यास त्यातील एखादा शिक्षक दुसर्‍या शाळेत पाठवून वेळ मारून नेली जात आहे !

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी गोवा सिद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच त्या अनुषंगाने गोव्यात येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गोवा राज्य आणि गोवा सरकार सज्ज झाले आहे. ही महत्त्वाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोव्यात तयारी पूर्णत्वाला येत आली आहे.

गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या आगमनाला प्रारंभ

२६ ऑक्टोबरपासून गोव्यात होणार्‍या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी त्यात सहभागी होणार्‍या खेळाडूंचे गोव्यात आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे. १७ ऑक्टोबरला क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दाबोली विमानतळावर काही खेळाडूंचे स्वागत केले.

फातोर्डा (गोवा) येथे ईदच्या मिरवणुकीत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधाने : पोलिसांकडून गुन्हा नोंद

हिंदूंनी केवळ गुन्हा नोंद झाल्याविषयी समाधान न मानता संबंधितांना अटक होऊन न्यायालय त्यांना दोषी ठरवेपर्यंत पाठपुरावा घ्यावा ! अशी प्रकरणे कालांतराने मिटवली जाण्याचीही शक्यता असते !

गोव्यातील व्याघ्रक्षेत्राचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालावर अवलंबून ! – महाधिवक्ता पांगम

उच्च न्यायालयाने गोवा सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तसेच, वनात रहाणार्‍या लोकांच्या अधिकारासंबंधी विचार ही कारणे देऊन ही मुदतवाढ मागता येईल.

अध्यात्मप्रसार करतांना पुढील गोष्ट लक्षात ठेवा !

‘देवाचे अस्तित्वच न मानणारे कधी ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा विचार करू शकतील का ? साधकांनी अध्यात्मप्रसार करतांना अशांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये मिळणार विनामूल्य रोजगार प्रशिक्षण !

महाराष्ट्रातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रे चालू करण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये शिवणकाम, वेष्टन करणे यांसह इलेक्ट्रिकल्स कोर्स, पंप दुरुस्ती, बांधकाम आदी विविध रोजगार प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चा २३ लाख नागरिकांकडून लाभ !

‘आपला दवाखाना’मध्ये विनामूल्य वैद्यकीय पडताळणी, औषधोपचार यांसह रक्त चाचण्यांची सेवा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. विशेष तज्ञांच्या सेवाही पॉलीक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.