गोवा : उसप, डिचोली येथे मंदिरात चोरी

मंदिराचे पुजारी सकाळी मंदिरात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर देवस्थान समिती आणि पोलीस यांना याविषयी माहिती देण्यात आली. चोरट्यांनी दानपेटी फोडून आतील रक्कम काढून पेटी मंदिराच्या जवळ टाकून दिली होती.

सिंधुदुर्ग : पोपट आणि शेकरू अवैधरित्या कह्यात ठेवल्याच्या प्रकरणी कैस बेग वन विभागाच्या कह्यात

सावंतवाडी येथे कैस बेग याने अवैधरित्या संरक्षित प्राणी स्वत:च्या कह्यात ठेवले आहेत, अशी माहिती येथील वन विभागाच्या कार्यालयाला प्राप्त झाली. या माहितीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

गोवा : ३ अल्पवयीन मुलांनी त्यांच्या अल्पवयीन मित्राला १८ वेळा ‘बॅट’ने शरिरावर प्रहार करून केले घायाळ !

अमली पदार्थांच्या व्यसनाचा अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम ! आतातरी पोलीस आणि प्रशासन यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील भावी पिढीला वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत !

वैज्ञानिक आणि संत !

वैज्ञानिक स्थुलातील गोष्टींचे संशोधन करतात, तर संत सूक्ष्मातील गोष्टी जाणतात आणि काही प्रसंगी त्यावर अधिकारही मिळवतात. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नवरात्रोत्‍सव जवळ येऊनही येरमाळा (जिल्‍हा धाराशिव) बसस्‍थानकाची दुरुस्‍ती अपूर्ण !

स्‍थानकातील खड्ड्यांत पावसाचे पाणी साठले असल्‍याने प्रवाशांचे आरोग्‍य आणि सुरक्षितता यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत श्री येडेश्‍वरीदेवीच्‍या दर्शनाला संपूर्ण महाराष्‍ट्रातून लाखो भाविक येतात. या पार्श्‍वभूमीवर ‘लवकरात लवकर बसस्‍थानकाची दुरुस्‍ती करण्‍यात यावी’, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत !  – नितेश राणे, आमदार, भाजप

नवरात्रोत्‍सव आणि गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत. आयोजकांनी येणार्‍यांचे आधारकार्ड पडताळूनच त्‍यांना प्रवेश द्यावा.

‘तुळजापूर बंद’ला पुजारी आणि व्‍यापारी यांचा १०० टक्‍के प्रतिसाद !

मंदिर प्रशासनाने स्‍थानिक पुजारी आणि व्‍यापारी यांना विश्‍वासात घेऊन विकास आराखडा सिद्ध करणे अपेक्षित होते. घाडशीळ येथे दर्शन मंडप उभारणे भक्‍तांसाठी गैरसोयीचे होणार आहे.

श्री महालक्ष्मी मंदिरातील भाविकांच्‍या सोयीसाठी फिरती स्‍वच्‍छतागृहे प्रदान !

साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्‍सव काळात भाविकांची संख्‍या वाढल्‍याने वाहनतळाच्‍या ठिकाणी स्‍वच्‍छतागृहांची आवश्‍यकता असते. हे लक्षात घेऊन ‘इंडोकाऊंट फाऊंडेशन’कडून महिला आणि पुरुष भाविक यांच्‍यासाठी स्‍वतंत्र ‘स्‍टेनलेस स्‍टील’मधील मोबाईल (फिरती) स्‍वच्‍छतागृहे देवस्‍थान समितीला सुपुर्द करण्‍यात आली.