नवरात्रोत्‍सव जवळ येऊनही येरमाळा (जिल्‍हा धाराशिव) बसस्‍थानकाची दुरुस्‍ती अपूर्ण !

बसस्‍थानकात खड्डे, प्रवाशांचे हाल

बसस्‍थानकातील खड्ड्यांमध्‍ये साठलेले पावसाचे पाणी

येरमाळा (जिल्‍हा धाराशिव), ११ ऑक्‍टोबर (वार्ता.) – येरमाळा बसस्‍थानक हे सोलापूर – धुळे राष्‍ट्रीय महामार्गावर असलेले महत्त्वाचे बसस्‍थानक आहे. असे असूनही बसस्‍थानकात खड्ड्यांचे साम्राज्‍य दिसून येत आहे. सध्‍या स्‍थानकाच्‍या दुरुस्‍तीचे काम चालू आहे; मात्र नवरात्रोत्‍सव तोंडावर येऊन ठेपलेला असूनही अद्याप दुरुस्‍तीचे काम अपूर्णच आहे. स्‍थानकातील खड्ड्यांत पावसाचे पाणी साठले असल्‍याने प्रवाशांचे आरोग्‍य आणि सुरक्षितता यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नवरात्रोत्‍सवाच्‍या कालावधीत श्री येडेश्‍वरीदेवीच्‍या दर्शनाला संपूर्ण महाराष्‍ट्रातून लाखो भाविक येतात. या पार्श्‍वभूमीवर ‘लवकरात लवकर बसस्‍थानकाची दुरुस्‍ती करण्‍यात यावी’, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्‍या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)