खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या २ साथीदारांना देहलीत अटक

देहली पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाच्या  जवळच्या २ साथीदारांना येथे अटक केली. हे दोघे आरोपी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि हातबाँब जप्त केले आहेत.

इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य, संपूर्ण जग शरीयतच्या कक्षेत असेल ! – हमास

ही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता !

हमासला चिरडून टाकू ! – पंतप्रधान नेतान्याहू यांचा निर्धार

आम्ही असंख्य इस्रायली मुला-मुलींचे मृतदेह भूमीवर पडलेले पाहिले आहेत. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. असंख्य महिला आणि पुरुष यांना जिवंत जाळून मारण्यात आले. तरुण इस्रायली महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

इस्रायलमध्ये स्थापन करण्यात आले ‘एकता सरकार’ !

इस्रायल सरकारने हमासविरुद्ध चालू असलेल्या युद्धावर लक्ष ठेवण्यासाठी ‘एकता सरकार’ (युनिटी गव्हर्नमेंट) आणि ‘युद्ध मंत्रीमंडळ’ यांची स्थापना केली. या नव्या सरकारमध्ये विरोधी पक्षांचाही समावेश करण्यात आला आहे.

मणीपूर येथील म्यानमार सीमेवर सरकार १०० किमी लांबीचे कुंपण घालणार

कुंपण घातल्याने म्यानमारमधून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबेलच, असे म्हणता येणार नाही. त्यासाठी सर्तकतही रहावे लागणार !

पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधून घेतले आदि कैलास पर्वताचे दर्शन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी उत्तराखंडमधील पिथौरागड येथील आदी कैलास पर्वताचे दर्शन घेतले. येथेच पार्वती कुंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी येथे पूजा केली. येथून चीनची सीमा अवघ्या २० किमी अंतरावर आहे.

Pejawar Swamiji : अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

प्रभु श्रीराम हे आमच्यासाठी आदर्श असल्यामुळे सहस्रो वर्षे झाली, तरी आम्ही श्रीरामांची आराधना करत त्यांच्या आदर्शांचे पालन करत आलो आहोत; परंतु हे अन्य धर्मीय स्वतः जेथे बहुसंख्य होतात, तेथे धर्मांधतेचे क्रौर्य दाखवतात.

Israel-Palestine Conflict : भविष्यवाणी – एक देश भूपटलावरून नाहीसा होईल ! – श्री शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी

हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलने हमासला नष्ट करण्यासह गाझा पट्टीवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा चंग बांधला असल्याने हे भविष्य खरे ठरल्यास आश्‍चर्य वाटू नये !

गोव्यातील खाण घोटाळ्याचे अन्वेषण करण्यास विशेष अन्वेषण पथकाला संमती

खाण घोटाळ्याचे अन्वेषण तब्बल १० वर्षे कासवाच्या गतीने चालू रहाणे लज्जास्पद !

नागरिकांना विश्वासात घेतल्याविना आराखडा सिद्ध केला जाणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पेडणे परिसरातील अनेकांच्या घरांच्या भूमी अजूनही ‘सेटलमेंट’ विभागामध्ये समाविष्ट केलेल्या नाहीत; मात्र पेडणे ‘झोनिंग प्लान’मध्ये १ कोटी ४४ लक्ष चौ.मी. भूमी ‘सेटलमेंट’ विभागात दाखवण्यात आली आहे.