मुंबई – यंदा नवरात्रोत्सव आणि गरबा खेळायला येणारे हिंदूच हवेत. आयोजकांनी येणार्यांचे आधारकार्ड पडताळूनच त्यांना प्रवेश द्यावा. या कालावधीत लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने आयोजकांनी ही काळजी घ्यावी, अशी मागणी सकल हिंदु समाजाची असल्याची भूमिका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मांडली.